Jupiter Margi In Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठराविक वेळेनंतर आणि वेळोवेळी आपली स्थिती बदलतात. कधी ते मार्गी, कधी अस्त तर कधी उदय होतात. याचा परिणाम जाचकाच्या आयुष्यावर पडतो. ग्रहांच्या या स्थितीमुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. देवतांचा गुरू बृहस्पति 31 डिसेंबरला थेट भ्रमण करणार असल्याने मेष राशीत केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे येणारं नवीन वर्ष 2024 हे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभासह प्रगती घेऊन येणार आहे. (Guru Margi or jupiter transit will create kendra tirkon rajyog In 2024 money will fall on 3 zodiac signs)
केंद्र त्रिकोण राजयोगाचा कर्क राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या कुंडलीतील दहाव्या घरात तो मार्गी होणार आहे. त्यामुळे ही लोक नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे उंच शिखर चढणार आहे. नवीन वर्षात 2024 मध्ये तुम्हाला पैसे कमवण्याचे अधिक संधी मिळणार आहेत. पावलोपावली नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळणार आहे. वडिलांशी संबंध मजबूत होणार आहे. नवीन योजनांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल.
सिंह राशीच्या लोकांचं केंद्र त्रिकोण राजयोगामुळे नशीब फळफळणार आहे. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी प्रगती आणि यश घेऊन येणार आहे. कारण या राशीच्या कुंडलीतील थेट नवव्या भावात तो फिरणार आहे. त्यामुळे या लोकांसाठी गुरु मार्गी भाग्यवान ठरणार आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होणार असून तुमच्याबद्दल आदर वाढणार आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला चांगला नफा प्राप्त होणार आहे. देश विदेशात प्रवासाची संधी नवीन वर्षात येणार आहे. कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. तर स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अतिशय चांगल सिद्ध होणार आहे.
धनु राशीच्या लोकांच्या कुंडलीत पाचव्या भावात गुरु मार्गी होणार आहे. त्यामुळे येणारं 2024 हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. तर तुमच्या करिअरमध्ये काही काम कराल, त्याचा तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे. केंद्र त्रिकोण राजयोगामुळे तुमच्यामध्ये चांगली ऊर्जा आणि धैर्य वाढणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. प्रेमाला लग्नाच्या बंधनात बांधण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठीदेखील नवीन वर्ष गुरु कृपेने आनंदी असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)