Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध

Jadatva Yog In Pisces: राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे.

सुरभि जगदीश | Updated: Feb 23, 2024, 10:45 AM IST
Jadatva Yog: 18 वर्षानंतर मीन राशीत तयार होतोय विनाशकारी जडत्व योग; 'या' राशींनी रहावं सावध title=

Jadatva Yog In Pisces: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी एका ग्रहाचा कुठल्यातरी ग्रहाशी संयोग असतो, ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ग्रह राहू सध्या मीन राशीत आहे. बुध देखील 7 मार्च रोजी सकाळी 9.40 वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ योग तयार होत आहे. 

हा अशुभ योग तयार झाल्यामुळे काही राशींच्या व्यक्तींवर अचानक संकटं येण्याची शक्यता आहे. यासोबतच मानसिक, शारीरिक, कौटुंबिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घेऊया विनाशकारी जडत्व योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.

मेष रास (Mesh Zodiac)

या राशीच्या बाराव्या घरात विनाशकारी जडत्व तयार होतोय. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकाग्रता आणि संयमाचा अभाव दिसून येण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. आरोग्याबाबत थोडं सावध राहण्याची गरज आहे. जीवनशैलीत थोडासा बदल करणे खूप महत्वाचे आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

मीन रास (Meen Zodiac)

मीन राशीत, चढत्या घरात जडत्व योग तयार होणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. नोकरदार लोकांनी थोडं सावध राहणं आवश्यक आहे. तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. तुमचे काही गुप्त शत्रू तुमचे काही काम बिघडू शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार करा, कारण त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. 

तूळ रास (Tula Zodiac)

या योगामुळे खूप प्रयत्न केल्यानंतरही यश मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. आव्हानांनाही सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याविषयी बोलताना थोडे सावध राहण्याची गरज आहे. अनावश्यक चिंतेने तुम्ही त्रस्त होऊ शकता. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)