Budhaditya Rajyog : सूर्य-बुध यांच्या संयोगाने बनणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा

Sun Transit in Leo : सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या महिन्यात 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 10, 2023, 05:40 AM IST
Budhaditya Rajyog : सूर्य-बुध यांच्या संयोगाने बनणार बुधादित्य योग; 'या' राशींच्या घरी येणार भरपूर पैसा title=

Sun Transit in Leo : वैदिक ज्योतिषानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतात. यावेळी सूर्य देव दर महिन्याला त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. या महिन्यात 17 ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

सूर्याच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होणार आहे. बुध 25 ऑगस्ट रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. या दोघांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. बुध आणि सूर्य यांच्या संयोगातून हा योग तयार होईल. त्यामुळे सर्व राशीच्या लोकांवर याचा प्रभाव दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशीच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. पाहुयात या राशी कोणत्या आहेत.

तूळ रास

बुधादित्य राजयोगाची निर्मिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरणार आहे. यावेळी तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या व्यवहाराशी संबंधित सर्व वाद मिटणार आहेत. कुटुंबामध्ये एखादं मंगलकार्य घडणार आहे. कामाच्या योजना पूर्ण होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही नवीन प्रकल्पावर काम करत असाल तर तुम्हाला फायदा होईल 

मेष रास 

बुधादित्य राजयोग या राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच सूर्याच्या गोचरमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. विवाहित लोकांचे जीवन आनंदी असेल. नोकरदार लोकांची वेतनवाढ आणि पदोन्नती होऊ शकते. अचानक पैसे मिळू शकतात. आर्थिक बाबतीत तुम्हाला शुभ परिणाम मिळतील 

कर्क रास

बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. ऑफिसमधील लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे, त्यांना चांगला नफा मिळू शकतो. अनेक प्रकारच्या चांगल्या ऑफर्स येतील. तुम्हाला एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळतील.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )