Neechbhang Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतो. यावेळी अस्त आणि नीच हे देखील एका विशिष्ट कालावधीत होतं. या परिस्थितीचा परिणाम मानवी जीवनावर आणि जगावर दिसून येताना दिसतो. बुध 2 एप्रिल रोजी वक्री झाला आहे.
यावेळी 9 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये नीच होणार आहे. यामुळे दुर्मिळ असा नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशी यावेळी लकी ठऱणार आहेत.
नीचभंग राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध आणि शुक्र हे ग्रह तुमच्या राशीच्या 12व्या भावात स्थित असणार आहे. या काळात तुम्हाला शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरी यातूनही पैसे मिळू शकतात. मानसिक तणावातूनही तुम्हाला आराम मिळू शकेल. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो.
वृषभ राशीच्या लोकांसाठी नीचभंग राजयोग अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याच्या संधीही मिळतील. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही नवीन व्यवसाय करार करू शकता. वाहनं आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. सरकारी आणि राजकारणातील उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत.
नीचभंग राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. या काळात सुखसोयी आणि संसाधनांमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला परदेशातून लाभ मिळतील. तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी असणार आहे. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही शेअर बाजार आणि सोने-चांदीशी संबंधित काम केले तर तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )