Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे.   

नेहा चौधरी | Updated: Nov 12, 2023, 09:34 AM IST
Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी title=
Aditya Mangal Yoga with Mahalakshmi Raja Yoga in Diwali Change the fortunes of these zodiac signs with wealth

Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतात. त्यावेळी अनेक योग आणि राजयोग निर्माण होतात. काही खूप शुभ तर काही अशुभ असतात. पण आज दिवाळीला अनेक योगासह राजयोगाची निर्मिती झाली आहे. ज्यामुळे काही राशींवर पैशांची जबरदस्त बरसतात होणार आहे. एका रात्रीत त्यांचं नशीब पालटणार आहे. आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह महालक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग, हर्ष, उभयचारी, कहल आणि दुर्धार आहे. तर शनिमुळे शश राजयोगदेखील आहे. त्यामुळे या योगाचा कुठल्या राशींना आर्थिक फायदा होणार चला जाणून घेऊयात. (Aditya Mangal Yoga with Mahalakshmi Raja Yoga in Diwali Change the fortunes of  these zodiac signs with wealth)

'या' राशी होणार श्रीमंत !

कर्क रास  (Cancer Zodiac)   

कर्क राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी खूप शुभ असणार आहे. या लोकांची दिवाळी कुटुंबासोबत संस्मरणीय असणार आहे. तुम्ही काही चैनीच्या वस्तू खरेदी करणार आहात. उत्पन्नाचे स्रोत वाढणार असल्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 

कन्या रास (Virgo Zodiac) 

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवाळी खूप भाग्यशाली असणार आहे. तुमचा वाढलेला आत्मविश्वास आणि नशिबाची साथ यामुळे प्रत्येक कामात यश मिळणार आहे. शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी होणार आहात. चांगल आरोग्य लाभणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही तुमचं घर खूप सजवणार आहात आणि फराळाचा आनंद लुटणार आहात. कुटुंबात सुरू असलेली तेढ संपुष्टात येतील. व्यावसायिकांना विशेष लाभ होणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

ही दिवाळी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देवी लक्ष्मीचा अपार आशीर्वाद घेऊन आली आहे. तुम्ही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करणार आहात. व्यवसायात प्रगती होणार असून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. अडकलेले पैसे देखील प्राप्त होणार आहे. ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहणार आहे. 

मकर रास (Capricorn Zodiac)

ही दिवाळी मकर राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरणार आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढणार आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखणार आहात. तुम्ही तुमच्या मुलांकडून काही सकारात्मक बातम्या कानावर पडणार आहे. कापड व्यावसायिकांना मोठा नफा घेऊन ही दिवाळी आली आहे. 

हेसुद्धा वाचा - Rajyog : दिवाळीत शनिचा शश राजयोग व गजकेसरी राजयोग! 'या' राशींचं सर्व संकट होईल दूर

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात हे राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांसाठी या शुभ योगामुळे त्यांची अपूर्ण कामं मार्गी लागणार आहे. नोकरदार लोक 2024 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करु नफा कमविणार आहात. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छितात त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे.  व्यापार्‍यांना चांगला नफा मिळणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)