राजकीय पक्षांच्या देणगीचं गणित

राजकीय पक्षांना २० हजारांपेक्षा जास्त आलेल्या देणगीचे तपशिल आर्थिक वर्षात (१एप्रिल ते ३१ मार्च) निवडणुक आयोगाकडे दरवर्षी सादर करावा लागतो. राजकीय पक्षांना देणगीदारांचे नाव, पत्ता, PAN, देणगीची पध्दत या सर्व गोष्टींचा तपशिल द्यावा लागतो.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 28, 2014, 09:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, तुषार ओव्हाळ
राजकीय पक्षांना २० हजारांपेक्षा जास्त आलेल्या देणगीचे तपशिल आर्थिक वर्षात (१एप्रिल ते ३१ मार्च) निवडणुक आयोगाकडे दरवर्षी सादर करावा लागतो. राजकीय पक्षांना देणगीदारांचे नाव, पत्ता, PAN, देणगीची पध्दत या सर्व गोष्टींचा तपशिल द्यावा लागतो.
 १३ सप्टेंबर २०१३ च्या ADR च्या अहवालानुसार 75% देणगीचे स्वरूप हे बेनामी आहे.
 अनेक प्रकारच्या संस्था आणि व्यावसायिक संस्थांनी २००४-०५ ते २०११-१२ या ८ आर्थिक वर्षादरम्यान ३७८ कोटींची देणगी दिला आहे त्यातली ८७% ही नामी स्वरूपाची आहे.
 २००४-०५ ते २०११-१२ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांनी राष्ट्रीय पक्षांना देणगी दिली आहे जी एकूण २५% हून कमी आहे ७५% निधी हा बेनामी स्वरूपाचा आहे. हा अहवाल कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांनी दिलेल्या देणगीचे विश्लेषण आहे.
 काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांव्यक्तिरिक्त कुठल्याच राष्ट्रीय पक्षाने २०१२-१३ या आर्थिक वर्षाचे देणगीचे तपशिल सादर केलेले नाहीत. म्हणून या अहवालात २००४-५ ते २०११-१२ या आर्थिक वर्षांचे देणगी दिलेल्या तपशिलांचे विश्लेषण आहे.


काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, बसप या पक्षांनी जाहीर केल्याप्रमाणे त्यांना २००४-०५ ते २०११-१२ या ८ आर्थिक वर्षात कुठल्याच स्वयंसेवी संस्थेंने त्यांना २० हजार पेक्षा जास्त देणगी दिलेली नाही.
कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांनी दिलेली देणगी
 एकूण देणग्यांपैकी सगळ्यात जास्त देणगी भाजपला म्हणजे ११३४ देणगीदारांकडून १९८.४७ कोटी निधी मिळाला आहे. त्याखालोखाल काँग्रेसला ४१८ देणगीदारांकडून १७२.२५ कोटी निधी मिळाला आहे.

राष्ट्रीय पक्षांचे मोठे देणगीदार
 काँग्रेस :- आदित्य बिर्ला समूहाचे General Elector Trust या संस्थेने सर्वात जास्त म्हणजेच ३६.४१ कोठी त्यानंतर Torrent Power LTD यांनी ११.८५ कोटी आणि Bharti Elector Trust या संस्थेने ११ कोटींची देणगी दिली आहे.
 भाजप:- आदित्य बिर्ला समूहाचे General Elector Trust या संस्थेने २६.५७ कोटी निधी दिला त्यानंतर Torrent Power LTD यांनी १३ कोटी आणि Asianet V Holding pvt ltd यांनी १० कोटींचा निधी दिला आहे.
 NCP: - अंबुजा सिमेंट, Hindustan Construction आणि Infina Finance यांनी प्रत्येकी १ कोटीचा निधी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला.
 CPI & CPM: - CPI ला १३ कॉर्पोरेट कंपन्यांकडून ११ लाखांची देणगी मिळाली. तर CPM ला १.७८ कोटींची देणगी मिळाली आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रातून राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्या
 विश्वस्त आणि समूह संस्था (Trust & Group of Companies):- काँग्रेसला यांच्याकडून सर्वात जास्त म्हणजे ७०.२८ कोटी तर भाजपला उत्पादन संस्था (Manufacturing ) यांच्याकडून 58.18 कोटी तर तेल आणि उर्जा (Oil & power) क्षेत्रातून १७.६ कोटींची देणगी मिळाली.
 खाणकाम, बांधकाम, आयात/निर्यात क्षेत्राकडून काँग्रेसला २३.०७ कोटी तर भाजपला Real Estate कडून १७.०१ कोटींची देणगी मिळाली आहे.
असे देणगीदार ज्यांनी देणगी देण्याच्या पध्दतीचा तपशिल दिलेला नाही.
 ५८ देणगीदार ज्यांनी १.०२ कोटींची देणगी दिली आहे. त्यांनी देणगीच्या पध्दतीचा तपशिल दिला नाही.
Foreign funds आणि भाजप, काँग्रेस
 Foreign Contribution Regulation Act (FCRA) 1976 3 & 4 नुसार भारतातल्या विदेशी कंपन्यांकडून निधी स्विकारण्यास भारतीय राजकीय पक्षांना मनाई आहे.
 या २००४-०५ ते २०११-१२ या ८ आर्थिक वर्षात विदेशी कंपन्यांनी काँग्रेसला ९ कोटी ८३ लाख तर भाजपला १९ कोटी ४२ लाख एवढा निधी मिळाला.

 २००९ साली निवडणुका होत्या त्या वर्षी सर्वात जास्त निधी म्हणजेच १५८.६८ कोटी निधी राजकीय पक्षांना मिळाला.