नवी दिल्ली : लॅपटॉप चार्ज करताना शॉक लागून तरूणाचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका तरूणाला भलतंच महागात पडलं असून शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ब्रिजेश असे मृत तरूणाचे नाव आहे.
अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं आणि अवघ्या काही काळातच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर आणि पत्नीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ब्रिजेश हा हरियाणातील फरिदाबादमधील एका एक्स्पोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होता. रविवारी ब्रिजेश आणि त्याची पत्नी खोलीत असताना ब्रिजेश लॅपटॉप चार्जिंगला लाऊन त्यावर काम करत होता. दुपारी अडीचच्या सुमारास त्याला अचानक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला.