सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक

आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात. 

Updated: Nov 30, 2016, 09:43 PM IST
सावधान! मोबाईलचे हेडफोनही होऊ शकतात हॅक     title=

नवी दिल्ली: आपण मोबाईल, कॅम्प्युटर, तसेच सोशल साइट हॅक होण्याच्या बातम्या ऐकल्या होत्या, परंतु आता चक्क हेडफोन देखील हॅक होऊ शकतात. 
वायर्डच्या एका माहितीनुसार, इस्राईलच्या एका समुहाने हेडफोन हॅकींगचा प्रयोग केला आहे. 

मालवेयरच्या माध्यमातून आपल्या हेडफोनला माइक्रोफोनमध्ये बदले जाते. आणि त्याच्या माध्यमातून आपले संभाषण रेकॉर्ड होत राहते. 
   
इस्राईलच्या बेन ग्यूरियोन युनिवर्सिटीने एक प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट तयार केला आहे. त्यात सांगितले आहे की, हॅकर्स आपले ऑडियो रेकॉर्ड करण्यासाठी तसेच आपले संभाषण ऎकण्यासाठी हेडफोन हॅक करू शकता. चकीत करणारी गोष्ट म्हणजे हेडफोन कंम्प्युटरला हेडफोन कनेक्ट नसतानाही हॅकर्स आपले संभाषण ऎकू शकतात. 
   
मालवेयरच्या माध्यमातून हेडफोनचे स्पीकर मायक्रोफोनमध्ये कनवर्ट केले जाते. त्यामुळे आपल्याकडील ऑडियो हॅकर्सपर्यंत पोहचतात. तसेच एका खोलीत होणारी बातचीत कमी अधिक प्रमाणावर कवर केली जाऊ शकते. 
   
इयरबर्डसला मायक्रोफोन म्हणून देखील वापरले जाऊ शकते. रिसर्चसने हेडफोन हॅकींगच्या पहिला कॅम्प्युटरच्या कोडेक चिपसेट realtek audio ला हॅक केले. एकदाका ऑडियो चिप हॅक झाली की नंतर इनपूट आणि आऊपूट स्विच केले जातात. त्यानंतर हेडफोन इनपूट डिवाइसचे काम करत असते. 
  
आपल्या हेडफोनमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन असेल तर हॅकर्ससाठी खूप सोप्पे काम आहे. पण जर आपल्या हेडफोनमध्ये मायक्रोफोन नसेल तरी हॅकर्स हेडफोन हॅक करू शकतात.