मुंबई: सर्वात प्रसिद्ध असलेल्या व्हॉट्स अॅप मोबाईल अॅप्लिकेशन आता फ्री व्हॉइस कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं कळतंय. याचा उपयोग व्हॉट्स अॅपचा वापर करणाऱ्या 60 कोटी ग्राहकांना होणार आहे.
लीक झालेल्या फोटोंनुसार अॅप्लिकेशनचा इंटरफेस बदललेला दिसतोय. ज्याला व्हॉइस कॉलिंगची सुविधाही जोडलेली दिसतेय. Thefusejoplin.com वर छापलेल्या बातमीनुसार लीक झालेलं इंटरफेसमध्ये इतर भाषांच्या भाषांतराची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलीय. तसं ऑप्शन आपल्याला अॅपमध्ये दिसतं. ज्याद्वारे आपण व्हॉट्स अॅपच्या माध्यमानं कॉल रिसिव्ह करू शकता.
व्हॉट्स अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये ट्रांसलेशनचं फीचर उपलब्ध आहे. ज्यामुळं ही बातमी खरी असू शकते, असं बोललं जातंय. फेसबुकवरही व्हॉइस कॉलिंग सुरू केली जाईल की नाही, याबद्दल अजून काही सूचना मिळालेली नाहीय. कारण व्हॉट्स अॅपची मालकी फेसबुककडेच आहे, हे आपल्याला माहितीच आहे.
जेव्हापासून फेसबुकनं व्हॉट्स अॅपला विकत घेतलंय, त्याच्या यूजर्सच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झालीय. फक्त भारतातच 5 कोटी लोक व्हॉट्स अॅपचा वापर करतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.