व्हिडिओ : मद्यधुंद अवस्थेत मुलगी मदत मागते तेव्हा...

काय होतं जेव्हा मदयधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते... हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा... 

Updated: Nov 13, 2014, 08:56 AM IST
व्हिडिओ : मद्यधुंद अवस्थेत मुलगी मदत मागते तेव्हा... title=

नवी दिल्ली : काय होतं जेव्हा मदयधुंद अवस्थेत आणि तोकड्या कपड्यांमध्ये एखादी मुलगी अनोळखी लोकांना मदत मागते... हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा... 

हा देखील एक सोशल एक्सपेरिमेंट आहे... स्टिफन झांग यानं हा व्हिडिओ ८ नोव्हेंबर रोजी सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड केलाय. पण, फारच कमी कालावधीत हा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

मद्यधुंद अवस्थेत एकटं फिरणाऱ्या मुलीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करताना अनेक जण या व्हिडिओमध्ये दिसतायत. ही मुलगी काही पुरुषांना आपल्याला मदत करण्यासाठी विचारते. पण, केवळ एक जण तिला मदत करताना दिसतोय... मात्र इतर जण तिला आपल्यासोबत आपल्या घरी किंवा कारमध्ये घेऊन जाण्यासाठी तयार आहेत.   

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.