बीजिंग: एका तरुणीचं मन जिंकण्यासाठी कितने आयफोन लागतील? उत्तर कदाचित कोणाला नाही माहित. मात्र चीनमध्ये राहणाऱ्या एका तरूणानं उचललेल्या पावलामुळं या प्रश्नाचंही उत्तर सर्वांना मिळालंय. कारण त्यानं तब्बल 99 आयफोनद्वारे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय.
गुआंगझूचा राहणाऱ्या एका प्रोग्रॅमरनं आपल्या गर्लफ्रेंडला अनोख्या पद्धतीनं प्रपोज केलं. त्यानं 99 आयफोन विकत घेतले आणि त्यांना जमीनीवर ठेवून त्याचा 'दिल'च्या आकारात अंगठी असं सजवलं. या अंगठीच्या मधोमध उभं राहून त्यानं आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. पण 'द नानफांग' मध्ये छापलेल्या बातमीनुसार तरुणीनं त्याचं हे प्रपोजल रिजेक्ट केलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या तरुणानं आयफोन खरेदी करण्यासाठी तब्बल 50 लाखांहून अधिक रक्कम खर्च केली. हा पैसा त्या तरूणाच्या दोन वर्षांच्या सॅलरी इतकी होती.
नंतर या प्रपोजलचे फोटो चीनची सोशल वेबसाइट 'वीबो' वर वायरल झाली. सोशल मीडियावरील काही लोकांच्या कमेंट्समध्ये ही वागणूक 'मूर्खपणा'ची म्हटल्या गेलंय. विशेष म्हणजे तरुणानं ज्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरला तरुणीला प्रपोज केलं त्या दिवशी चीनमध्ये 'सिंगल्स डे' साजरा केला जातो.
भारतासारखंच चीनमध्ये आयफोन म्हणजे महागडा आणि प्रेस्टिजिअस फोन समजला जातो. जरी प्रोग्रॅमरला त्याचं प्रेम मिळालं नसेल, तरी जर त्यानं आपलं डोकं वापरलं आणि ते 99 फ्रेश आयफोन विकले तर बराचसा पैसा त्याला परत मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.