VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...

एखाद्या सापानं चावा घेतल्यानं प्राण्याचा किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल पण, एखाद्या सापानं स्वत:लाच चावा घेणं हे मात्र तुम्हाला थोडं अजब वाटेल.

Updated: Sep 9, 2015, 01:37 PM IST
VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...  title=

मुंबई : एखाद्या सापानं चावा घेतल्यानं प्राण्याचा किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल पण, एखाद्या सापानं स्वत:लाच चावा घेणं हे मात्र तुम्हाला थोडं अजब वाटेल.

पण, ही घटना अगदी सत्य आहे... आणि हे दृश्यं कॅमेऱ्यातही कैद झालंय. काही दिवासांपूर्वी यूट्यूबवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. यामध्ये, एका सापानं आत्महत्या केल्याचं स्पष्ट दिसतंय. 

या व्हिडिओत एक साप रस्त्यावर येताना दिसतोय... तो पुढे जाण्याचा प्रयत्न करतो पण स्वत:च्याच शरीराला तो वेटोळे घेतो... आणि या प्रयत्नात तो स्वत:लाच चावा घेताना दिसतोय. त्यामुळे, तरफडून त्याचा मृत्यूही झालाय. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.