मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन

मायक्रोमॅक्सचा ब्रॅंड YUने Yunique स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा सर्वात स्वस्त फोन आहे. इ कॉमर्स साइट स्नॅपडीलवर हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांना आहे. या फोनचे रजिस्ट्रेशन कालपासून सुरु झाले असून ते १४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे.

Updated: Sep 9, 2015, 12:10 PM IST
मायक्रोमॅक्सचा सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन  title=

मुंबई : मायक्रोमॅक्सचा ब्रॅंड YUने Yunique स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा सर्वात स्वस्त फोन आहे. इ कॉमर्स साइट स्नॅपडीलवर हा स्मार्टफोन ४,९९९ रुपयांना आहे. या फोनचे रजिस्ट्रेशन कालपासून सुरु झाले असून ते १४ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत राहणार आहे.

हा फोन फ्लॅश सेलनुसार विक्री करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबरपासून मंगळारी दुपारी १२ वाजता फ्लॅश विक्री होणार आहे. 

देशात सर्वात स्वस्त ४ जी स्मार्टफोन असणार आहे. याची किंमत ४,९९९ रुपये आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रगन ४१० प्रोसेसर, एड्रीनो ३०६ सीपीयु आणि १ जीबी रॅमचा असून ८ जीबीची इंटरनल मेमरी असणार आहे. याची मेमरी मायक्रोएसडी कार्डने वाढविता येऊ शकणार आहे.

हा फोन ४.७ इंच असून रेझोल्यूशन ७२० असून गोरिला ग्लास ३ असणार आहे. तर ८ मेगाफिक्सल कॅमेरा असून फ्रंड २ मेगापिक्सल कॅमेरा आहे. बॅटरी क्षमता २,००० एमएएच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.