‘फेसबुक’वर खऱ्या प्रोफाईल कशा ओळखाल...

Updated: Nov 20, 2014, 07:36 PM IST
‘फेसबुक’वर खऱ्या प्रोफाईल कशा ओळखाल... title=

 

मुंबई : सोशल नेटवर्किंगमुळे सेलिब्रेटीज चाहत्यांच्या अधिक जवळ आले आहेत. मात्र याचाच गैरफायदा घेत, सोशल नेटवर्किंगवर लोकप्रिय व्यक्तींच्या नावाने खोटी प्रोफाइल्स बनवून त्यामार्फत गैरप्रकार होण्याचे प्रकार वाढले आहेत.
सेलिब्रेटीजनी यावीरोधात आवाज उठवण्यास सुरूवात केली असली तरी खोट्या प्रोफाइल्सना आजही लाखोच्या संख्येने हिट्स मिळतायत. अशा बनावट सेलिब्रेटी प्रोफाइल्सपासून आपणही सावध राहिलं पाहिजे.
कशी ओळखावीत फेक अकांउट?
सर्वसामान्यपणे खऱ्या सेलिब्रेटीजची पेजेस व्हेरीफाइड असतात. ज्यामध्ये सेलिब्रेटींच्या नावापुढे निळ्या रंगाची, ‘बरोबर’ असं दर्शवणारी अशी टीक असते जी फेसबुककडूनच व्हेरीफाइड म्हणून पुरवली जाते. पेजला व्हेरिफाइडची टीक नसेल तर त्या पेजशी ऑफिशिअल वेबसाइट्सच्या लिंक कनेक्ट केलेल्या असतात.
खऱ्या प्रोफाइलवरुन अनेकदा सेलिब्रेटीजचे आधी न पहिलेले फोटो आणि खासगी मतं शेअर केली जातात. फेसबुकशिवाय ट्विटर, इन्स्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरही अनेक सेलिब्रिजची खोटी अकाऊंटस असून त्यांनाही लाखोच्या संख्येने फॉलोअर्स आहेत.
कायदा काय सांगतो?
एखाद्या व्यक्तीच्या नावाने खोटं अकाऊंट बनवणं हा गुन्हा आहे. २००८ मधील सुधारीत आयटी अॅक्टनुसार एखाद्या व्यक्तीचं खोटं अकाऊंट बनवल्याप्रकरणी दोषी अढळल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तर या अकाऊंटचा वापर करुन कुठलीही माहीती इंटरनेटवर टाकल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.