ऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या

'बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना' हे गाणे आजच्या ऑनलाइन डेटिंगबाबत एकदम फिट बसते. कॅनेडिन ब्रॉडकास्टिंग कॉ़र्पोरेशननुसार यूएसमध्ये ४ कोटीपेक्षा अधिक आणि कॅनेडामध्ये ७० लाखांपेक्षा अधिक लोक ऑनलाइन डेटिंगमध्ये इंटरेस्टे़ आहे. हे आकडे तुम्हांला धक्का देऊ शकतात. पण लाखो लोक असे आहेत की जे ऑनलाइन डेटिंगला घाबरतात. भारतातही या ऑनलाइन डेटिंगने हळूहळू आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. या डेटिंगवेळी का काळजी घ्याची याच्या काही टिप्स...

Updated: Mar 27, 2015, 04:45 PM IST
ऑनलाइन डेटिंग करताना या गोष्टींची काळजी घ्या title=

मुंबई : 'बाबूजी धीरे चलना, प्यार में जरा संभलना' हे गाणे आजच्या ऑनलाइन डेटिंगबाबत एकदम फिट बसते. कॅनेडिन ब्रॉडकास्टिंग कॉ़र्पोरेशननुसार यूएसमध्ये ४ कोटीपेक्षा अधिक आणि कॅनेडामध्ये ७० लाखांपेक्षा अधिक लोक ऑनलाइन डेटिंगमध्ये इंटरेस्टे़ आहे. हे आकडे तुम्हांला धक्का देऊ शकतात. पण लाखो लोक असे आहेत की जे ऑनलाइन डेटिंगला घाबरतात. भारतातही या ऑनलाइन डेटिंगने हळूहळू आपले पाय पसरायला सुरूवात केली आहे. या डेटिंगवेळी का काळजी घ्याची याच्या काही टिप्स...

आपली पर्सनल माहिती कोणासोबत शेअर करू नका 
ऑनलाइन डेटिंगचा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे की आपली खासगी माहिती उघड करू नका. अशा वेबसाइटवर आपली माहिती विचारपूर्वक टाका. तुमचे प्रोफाइल पब्लिक असेत तर इंटरनेटच्या माध्यमातून त्याचा दुरूपयोग होऊ शकतो. तुमचे खरे नाव, घराचा पत्ता, फोन नंबर, बँक खाते ही माहिती किंवा अशी माहिती कोणताही विचार न करता इंटरनेटवर टाकू नका. कॉन्टॅक्ट नंबर अशा व्यक्तीला द्या ज्यावर आपण विश्वास ठेऊ शकतो. हे सर्व तुमची वैयक्तीक सुरक्षा आणि फायनान्सियल सुरक्षेसाठी गरजेचे आहे.

एखाद्या सार्वजनिक ठिकाणीच भेटा 
तुम्ही ज्याच्याशी चॅट करीत आहात, त्याने आपली खरी ओळख सांगितली नसेल. अशात कोणत्याही व्यक्तीला एकांत भेटू नका. पहिली भेट सार्वजनिक ठिकाणीच करा. तसेच कोणाला भेटायला जाताना मोबाइल फोन जवळ ठेवा.

जवळ्या व्यक्तीला सांगूनच भेटायला जा
जेव्हा तुम्ही ऑनलाइन डेटिंग पार्टनरला भेटायला जाणार असाल तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा कुटुंबातील व्यक्तीला सांगून जा. यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुमच्या ठिकाणाची माहिती असेल. वेळोवेळी फोन करून किंवा मेसेज करून तुम्ही सुरक्षित असल्याची सूचना देत राहा. 

पार्टनरला नीट ओळखा
ऑनलाइन डेटिंगनंतर भेटण्याची वेळ येईल तेव्हा आपला पार्टनर कसा आहे. हे नीट जाणून घ्या. चॅटिंग करताना त्याचा फोटो ऑनलाइन मागून घ्या. त्यामुळे यातून धोक्याची शक्यता कमी होते. 

सध्या अनेक साइट्सने इनबिल्ट सिक्युरिटी तयार केलेली असते. त्यामुळे धोकेबाजीची शक्यता कमी झाली आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हिडिओ चॅटच्या माध्यमातून तुम्ही पहिली भेट करू शकतात. 

पण तुम्ही ऑनलाइन डेटिंगच्या दुनियेत नव्याने पाऊल टाकत असाल तर सावधानता बाळगण्यात का फरक पडतो? खरं आहे ना?.......

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.