गाडीचा मायलेज वाढवण्याच्या काही टिप्स

आपली एखादी स्वत:ची गाडी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गाडी घेतोही, मात्र बऱ्याचदा डिझेल आणि पेट्रोलचे वाढणारे दर पाहता गाडी मेंन्टेन करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे गाडीचा माजलेज वाढून होणारा जास्तीचा खर्च टाळण्यासाठी गाडी वापरतांना काय काळजी घ्यावी यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. 

Updated: Mar 27, 2015, 03:44 PM IST
गाडीचा मायलेज वाढवण्याच्या काही टिप्स  title=

मुंबई : आपली एखादी स्वत:ची गाडी असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण गाडी घेतोही, मात्र बऱ्याचदा डिझेल आणि पेट्रोलचे वाढणारे दर पाहता गाडी मेंन्टेन करणे कठीण होऊन बसते. त्यामुळे गाडीचा माजलेज वाढून होणारा जास्तीचा खर्च टाळण्यासाठी गाडी वापरतांना काय काळजी घ्यावी यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत. 

१) गाडीच्या टायरमधील हवा आणि गाडीचा मायलेज यांच अनोखं नातं आहे. गाडीच्या टायरची हवा बऱ्याचदा गाडीच्या मायलेजवर परिणाम करते. त्यामुळे वेळोवेळी गाडीच्या टायरमधील हवेची तपासणी करावी, खासकरून लांबच्या प्रवासात. जास्त घासलेला टायर सहसा बदलून टाकावा.

२) गाडी ओबडधोबडपणे चालवू नये. गाडीचा क्लच, ब्रेक, गिअर आणि एक्सिलेटरचा वापर योग्यरीत्या करावा. गाडीच्या स्पीडनुसार योग्यवेळी गिअर बदलावे. क्लच दाबून गाडी चालवणे शक्यतो टाळावे. 

३) कमी अंतरावर जाण्यासाठी गाडीचा उपयोग टाळावा. तसे केल्यास गाडीचा मायलेज कमी होण्याची जास्त शक्यता असते. वारंवर इंजन चालू बंद केल्यानेसुद्धा गाडीचा मायलेज कमी होऊ शकतो. 

४) हवेचा आणि गाडीचाही संबध आहे. गाडी चालवतांना गाडीच्या काचा नेहमी बंद ठेवाव्यात. गाडीच्या काचा उघड्या ठेऊन गाडी चालवल्यास पेट्रोलची टाकी लवकर रिकामी होऊ शकते. 

५) गाडीत हलकी राहील याची काळजी घेतली पाहीजे. गाडीत गरजेचे सामानच ठेवावे. कारण गाडी जेवढी हलकी तेवढा गाडीचा मायलेज चांगला राहतो. 

६) सिग्नल किंवा ट्रॅफिकमध्ये गाडी बंद करावी. गाडी बंद केल्याने तुमचं इंधन तर वाचेलच पण प्रदूषण कमी होण्यास मदतही होईल. 

७) वेळोवेळी गाडीची सर्व्हिसिंग करावी त्याने गाडीचा मायलेज चांगला राहण्यास मदत होते. नियमितपणे गाडीचं इंजन ऑइल, एयर फिल्टर, गिअर ऑयल बदलावे. त्यामुळे गाडी चांगल्या स्थितीत राहते.

८) पेट्रोल भरण्यासाठी योग्य पेट्रोलपंपाची निवड करावी. भेसळयुक्त पेट्रोलचे गाडीवर वाईट परिणाम होतात.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.