रिंगिग बेल्सने फ्रीडम २५१चे पैसे परत केले

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोन बुक करणाऱ्या ३० हजार लोकांचे पैसे परत केलेत. 

Updated: Mar 4, 2016, 06:26 PM IST
रिंगिग बेल्सने फ्रीडम २५१चे पैसे परत केले title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ लाँच करणारी कंपनी रिंगिंग बेल्सने स्मार्टफोन बुक करणाऱ्या ३० हजार लोकांचे पैसे परत केलेत. या स्वस्त स्मार्टफोनची बुकिंग सुरु झाल्यानंतर फ्रीडम २५१च्या वेबसाईटवर अक्षरक्ष गर्दीचा पूर आला होता. 

इतक्या कमी किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध होत असल्याने एकाचवेळी लाखो लोकांनी या वेबसाईटला लॉगइन केले होते. त्यामुळे बुकिंग सुरु झाल्यानंतर काही काळातच वेबसाईट क्रॅश झाली होती. वेबसाईट क्रॅश झाल्यानंतर कंपनीने ग्राहकाचे २५१ रुपये परत केल्याचे जाहीर केले. आता कंपनी डिलीव्हरी करताना कॅश स्वीकारणार आहे. 

शुक्रवारी रिंगिंग बेल्सचे अध्यक्ष अशोक चड्डा यांनी फ्रीडम २५१साठी ग्राहकांना फोन डिलीव्हर झाल्यानंतर पेमेंट करावे लागेल असे सांगितले होते. तसेच ज्यांनी फ्रीडम २५१साठी ऑर्डर दिल्यात त्यांना फोन डिलीव्हर केल्यानंतरच कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे पेमेंट घेतले जाईल असे चड्डा यांनी सांगितले. 

कंपनी ३० जून पर्यंत पहिल्या २५ लाख लोकांना फ्री़डम २५१ स्मार्टफोन देणार आहे.