मुंबई : आपण रेनॉ क्विड (Renault Kwid) या गाडीच्या प्रतिक्षेत असाल तर ही प्रतिक्षा आता संपली आहे. कारण रेनॉ इंडियाने गुरुवारी क्विड ही लहान कार लॉन्च केली. दिल्लीच्या एक्स शो रुममध्ये या कारची किंमत २,५६,९६८ रुपये आहे. रेनॉच्या स्वस्त कारमुळे आता लहान कारमध्ये अधिक स्पर्धा निर्माण होणार आहे.
रेनॉ क्विडच्या स्टॅंडर्ड कारची किंमत २.५६ लाख आणि टॉप मॉडेलची किंमत ३.५३ लाख रुपये आहे. तसेच याशिवाय कंपनीने कारच्या आणखी काही व्हरायटीज असणार असून त्यांच्या किंमती वेगवेगळ्या असणार आहेत.
क्विड कारची लांबीबाबत विचार केला तर मारुती अल्टो ८०० आणि इऑन या कार पेक्षा थोडी मोठी आहे. रेनॉ क्विडची अंतर्गत रचना एकदम सुंदर आहे. तसेच आरामदायी आहे. त्यामुळे ही कार आपले लक्ष वेधते. या कारला 'बेबी डस्टर' असे नाव दिले गेले आहे. कारण ही कार दिसायला डस्टर कार सारखी दिसते. या क्विड कॉम्पॅक्ट कारचे वैशिष्ट्य म्हणजे प्रोफाइल एक नवीन आणि अद्वितीय आहे. रेनॉ क्विडचे इंजिन ८०० सीसी आहे. मारुती ऑल्टो आणि टाटाची नॅनो झेन एक्स या कारला जोरदार टक्कर देऊ शकते.
क्विड कारचे मायलेज पेट्रोल इंजिनला २५.१७ किलोमीटर प्रति लीटर आहे. मात्र, मारुतीची आल्टो ८०० २२.७४ किलोमीटर प्रति लीटर आहे. तर इऑनचे २१.१ किलोमीटर प्रति लीटर मायलेज आहे. या तिन्ही कार ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सवर धावतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.