मुंबई : बजेट कारची वाढती मागणी लक्षात घेऊन आता या स्पर्धेत 'रेनॉल्ड' या कार निर्माती कंपनीनं आपली आणखीन एक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
आकारानं छोटी आणि सामान्यांच्या खिशालाही परवडेल अशा या कारद्वारे रेनॉल्ट देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या मारूती ऑल्टो आणि हुन्डाई इयॉन या गाड्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.
चेन्नईत पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात कंपनीचे चेअरमन कारलोस घोस्न यांच्या हस्ते या नव्या कोऱ्या मॉडेलचं लॉन्चिंग होणार आहे.
छोट्या कार्सच्या सेगमेंटमध्ये आपलं स्थान मजबूत बनवण्याच्या प्रयत्नात रेनॉल्ड ही आपली कार सादर करणार आहे.
या कारची विक्री यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. छोट्या सेगमेंटमधील ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी कंपनीला आशा आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.