न्यूयॉर्क : तुम्ही फेसबुक मॅसेंजर वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे... आता, हे मोबाईल अॅप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला केवळ मोबाईलवर अवलंबून राहण्याची गरज उरलेली नाही.
कारण, फेसबुक मॅसेंजरनं आपलं वेब व्हर्जन लॉन्च केलंय. यामुळे, आता तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवर, लॅपटॉपवर किंवा टॅबलेटवरही या सेवेचा लाभ घेऊ शकाल.
यावर, तुम्ही म्हणाल फेसबुक तर पहिल्यापासूनच वेब व्हर्जनमध्ये आपल्या युझर्सना ही सुविधा देतं, मग याचा काय उपयोग? तर त्यावर मॅसेंजरचं उत्तर आहे की, मॅसेंजर टूलचे हे वेब व्हर्जन आपल्या उपभोगकर्त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देईल. फेसबुकच्या मुख्य पेजवर ही सुविधा तुम्हाला मिळू शकेल.
फेसबुकनं नुकतंच आपली मॅसेंजर सेवा आपलं मुख्य पेज facebook.com हून वेगळे वेबसाईट messenger.com च्या रुपात सुरु केलीय. या नव्या वेबसाईटचा वापर करण्यासाठीही तुमच्याकडे फेसबुक अकाऊंट असणं आवश्यक आहे.
मुख्य म्हणजे, फेसबुकवरील इतर सेवा टाळून ज्या उपभोगकर्त्यांना केवळ चॅटींग करणं आवडतं, अशांसाठी फेसबुकनं messenger.com ही सेवा उपलब्ध करून दिलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.