मुंबई : रिलायन्स जिओने मोफत व्हॉइस कॉलिंग आणि फ्री इंटरनेटचा ३१ डिसेंबरचा जाहीर केलेल्या प्लानवर ट्रायने यावर आक्षेप घेतल्याने रिलायन्सची फ्री ऑफर बोंबली आहे. 3 डिसेंबरपर्यंत ही सेवा घेणाऱ्यांनाच ३१ डिसेंबरपर्यंत फ्री इंटरनेट आणि व्हॉइसकॉलची सुविधा मिळणार आहे. 4 नोव्हेंबरला सबक्राइब करणाऱ्यांना ही ऑफर मिळणार नाही. .
रिलायन्स जिओने जिओ फ्री व्हॉइस कॉलिंग केवळ 4जी ग्राहकांसाठी देत आहे. पहिले चार महिने ही सेवा पूर्णपणे मोफत दिली. ही सेवा ४ सप्टेंबरला सुरू करण्यात आली, पुढील ९० दिवस म्हणजे ती सेवा ३ डिसेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ३ डिसेंबरपर्यंत ही सेवा घेणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत ही मोफत सेवा वापरता येणार आहे. आता ट्रायने यात हस्तक्षेप करून रिलायन्सच्या योजनेला ४ डिसेंबरनंतर चाप लावला आहे. त्यामुळे रिलायन्सला मोठा धक्का बसला आहे.
या संदर्भात पीटीआयने रिलायन्स जिओच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ३ सप्टेंबरपासून रिलायन्स जिओ घेतलेल्यांना ३१ डिसेंबरपर्यंत फ्री इंटरनेट आणि फ्री व्हॉइसकॉलची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा ३ डिसेंबरपर्यंत रिलान्सचे कार्ड घेणाऱ्यांना मिळणार आहे.
तसेच ३ डिसेंबरनंतर जे ग्राहक जिओशी जोडले जातील त्यांच्यासाठी नवीन ऑफर आमि टेरिफ प्लान असतील असेही प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.
रिलायन्सने आपली बहुचर्चित ‘जियो 4 जी' सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध करुन दिली. मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही सेवा लॉन्च केली होती. त्यानंतर ग्राहकांच्या उड्या पडल्यात.
डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा सादर केल्यात. कंपनी 4G सेवेचे सिम कार्ड देत आहे. काही ठिकाणी ही कार्ड मोफत दिली जात आहेत. रिलायन्स LYF ब्रँडच्या स्मार्टफोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा दिली गेली आहे. ग्राहकांचे सिमकार्ड सुरु झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही सवलत आहे. मात्र, ट्रायने दणका दिल्याने ही सेवा आता 3 डिसेंबरपर्यंतच सुरु राहणार आहे.