एअरटेलची ग्राहकांना १० जीबी इंटरनेटची ऑफर

टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. एअरटेलने देखील एक नव्या ऑफरची आता घोषणा केली आहे. एअरटेलने 4जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.

Updated: Oct 19, 2016, 05:23 PM IST
एअरटेलची ग्राहकांना १० जीबी इंटरनेटची ऑफर title=

मुंबई : टेलीकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन ऑफर्स ग्राहकांना देत आहेत. रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर अनेक कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतंय. एअरटेलने देखील एक नव्या ऑफरची आता घोषणा केली आहे. एअरटेलने 4जी मोबाईल हँडसेट खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवी ऑफर दिली आहे.

कोणताही ४ जी हॅंडसेटवर एअरटेल 259 रूपयांच्या रिचार्जवर १० जीबी इंटरनेट डेटा देणार आहे. 1 जीबी डाटा ग्राहकाला लगेच वापरता येणार आहे. तर बाकी 9 जीबी डाटा एअरटेल अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. 28 दिवसांची याची वैधता असणार आहे. सुरुवातीला ही ऑफर फक्त गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये लागू करण्यात आली होती पण आता ही ऑफर संपूर्ण भारतभर देण्यात आली आहे.