व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे इमोजी

व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट घेऊ येतेय. या नव्या व्हर्जनमुळे चॅटिंगची मजा आता अधिकच वाढणार आहे. 

Updated: Dec 5, 2015, 11:09 AM IST
व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे इमोजी title=

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉईड यूजर्ससाठी लवकरच एक नवीन अपडेट घेऊ येतेय. या नव्या व्हर्जनमुळे चॅटिंगची मजा आता अधिकच वाढणार आहे. 

व्हॉट्सअॅपवर मेसेज करण्यापेक्षा इमोजीद्वारे मेसेज पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या इमोजी मोठी मदत करतात. त्यामुळे इमोजीची वाढती क्रेझ पाहता व्हॉट्सअॅप नव्या व्हर्जनमध्ये धमाकेदार नव्या इमोजी आणणार आहे. 

तसेच यापूर्वी व्हॉट्सअॅप इमोजीचे केवळ पाच टॅब आपल्याला दिसत होते. मात्र नव्या अपडेटमध्ये या टॅबची संख्या आठ असेल. ज्यात स्पोर्ट्स, फ्लॅग, बल्ब आणि खाण्याच्या पदार्थांचा नवा सेक्शन असेल.

सर्वात आधी हे अपडेट नेक्सस सीरिजमधील स्मार्टफोनमध्ये येतील त्यानंतर इतर अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये हे अपडेट दिसतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.