'ओएलएक्स'चा वापर करून १६ लाखांनी लुटलं

Updated: Oct 17, 2014, 09:14 PM IST
'ओएलएक्स'चा वापर करून १६ लाखांनी लुटलं title=

मुंबई  ओएलएक्सवर कोणतंही जुनी, नको असलेली वस्तू विकण्यास मदत होते, मात्र तुम्हाला परदेशी नोकरीसाठी कुणी पैसे मागितले तर सावधान, कारण तुमची फसवणूक होऊ शकते.

कारण एका नायजेरियन व्यक्तीने 'ओएलएक्स डॉट कॉम' या वेबसाईटच्या माध्यमातून परदेशी नोकरीचे आमिष दाखवले, तसेचअनेकांना १६ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातलाय.

'परदेशात नोकरी मिळवा', असे आवाहन करणारी जाहिरात पाहून एका तरुणाने त्यासाठी अर्ज केला. मात्र आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. 
सप्टेंबर महिन्यात त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यावर सहायक पोलीस निरीक्षक जयवंत दरेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. 

तपासादरम्यान, नायजेरियन नागरिक असलेल्या चिमा जॉन इमॅन्युएल उर्फ पीटर बंकिंगहॅम वय ३६ याला पोलिसांनी अटक केली. तपासात चिमाची मोडस ऑपरेंडी पोलिसांच्या लक्षात आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.