Leaked:11 सप्टेंबरपासून सुरू होणार आयफोन 6s, आयफोन 6s प्लसची प्री-बुकींग

अॅपलटा मोस्ट अवेटेड आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसबद्दल एक नवीन बातमी आलीय. कंपनी 11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, आयफोन 6s प्लस ऑनलाइन लिस्ट करू शकते. 

Updated: Aug 24, 2015, 06:08 PM IST
Leaked:11 सप्टेंबरपासून सुरू होणार आयफोन 6s, आयफोन 6s प्लसची प्री-बुकींग title=
सौजन्य- यू ट्यूब

सॅन फ्रांसिस्को: अॅपलटा मोस्ट अवेटेड आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसबद्दल एक नवीन बातमी आलीय. कंपनी 11 सप्टेंबरपासून आयफोन 6s, आयफोन 6s प्लस ऑनलाइन लिस्ट करू शकते. 

फ्रान्सची वेबसाइट Mac4Ever नुसार अॅपल आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लस लॉन्च करणार आहे आणि अॅपलनं आपल्या कर्मचाऱ्यांना तसं सांगितलंय. दोन्ही अपकमिंग फ्लॅगशिप 11 सप्टेंबरपासून प्री-ऑर्डरसाठी ऑनलाइन उपलब्ध असेल.

लिनोव्होनं भारतात लॉन्च केला सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन A2010

गेल्या काही वर्षांपासून अॅपल सप्टेंबरच्या सुरूवातीलाच आयफोनसाठी इव्हेंटचं आयोजन करतं आणि यावेळी हे दोन नवे मॉडेल अॅपल 9 सप्टेंबरला लॉन्च करू शकतात.

खास फीचर्स -

- लीक रिपोर्टनुसार आयफोन 6s आणि 6s प्लसमध्ये 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. 
- सोबतच कॅमेरा 4k व्हिडिओ रेकॉर्ड करू शकेल. 
- फोनमध्ये आधीपेक्षा फास्ट असा 4G फोर्स टच डिस्प्ले अगोदर पेक्षा चांगलं असेल
- 9X क्वाडकोर प्रोसेसर
- 2जीबी रॅम मेमरी
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 16 जीबी आणि 32 जीबी मेमरी व्हर्जन असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.