नवी दिल्ली : गुगलने आपल्या अॅप स्टोरमधील अॅप्स फक्त दहा रूपयात उपलब्ध करून देण्याची सुविधा देऊ केली आहे.
यामुळे भारतात पैसे भरून अॅप्स खरेदी करण्याला प्रोत्साहन मिळेल.
"अॅप्स गुगल प्लेकडून वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भारत खूप मोठी वाढ करत आहे. त्यामुळे जास्त प्रतिसाद येण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत", अशी माहिती गुगलचे उत्पादक व्यवस्थापक एलिस्टेअर पॉट यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
"आमचे जागतिक डेव्हलपरकडून अॅप्स तसेच गेम्ससाठी भारतातून किती शुल्क वसूल केले पाहिजे याची कल्पना यावरून आम्हाला येईल"असेही पॅट यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमुद केले आहे.
डेवल्हपर्स आपले प्रिमीयम उत्पादन तसेच अॅप्सची किंमत दहा रुपये ठेऊ शकतात.
"ला आशा आहे कि भारतात अॅप्स वापरणाऱ्यांची संख्या या कमी शुल्कामुळे अजून वाढेल तसेच गुगल प्ले यामुळे अजून चांगले अॅप्स बाजारात आणू शकेल"असे वक्तव्य पॉट यांनी केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.