नवी दिल्ली : मारुती-सुझुकी डिसेंबरपर्यंत ऑल्टो ८०० चे डिझेलची कार लॉन्च करण्याची शक्यता आहे. ऑल्टो ८०० ला मारुतीने २०१२ मध्ये बाजारात आणले होते त्यानंतर आजतागायत यात कुठलेही अपडेट झालेले नव्हते.
आता ऑल्टो ८०० चे नवीन रूप दिसणार आहे. डिझेलच्या कारचे माईलेज सगळ्यात चांगले असेल अशी आशा लोकांकडून व्यक्त केली जात आहे. या वर्जनमध्ये ट्विन सिलेंडरचे ७९३ सीसी चे इंजिन असेल असे जाणकारांचे मत आहे. या इंजिनला सुझुकीने स्वतः विकसित केले आहे.
जून २०१५ मध्ये आलेल्या सेलेरियोमध्ये कंपनीने हेच इंजिन लावले होते. सेलेरियो डिझेल २७.६२ किमी प्रति लीटर मायलेज देते.
ऑल्टो ८०० यापेक्षा अधिक मायलेज देण्याचा अंदाज केला जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.