ह्युस्टन : जगातील प्रमुख सर्च इंजिन कंपनी गुगलने आपली सोशल नेटवर्किंग साईट, गुगल प्लसला अखेर गुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे. कंपनीने फेसबूकला तगडी टक्कर देण्याच्या उद्देशाने गुगल प्लसला चार वर्षापुर्वी सुरू केले होते.
गुगलशी जोडलेले सगळे उपक्रम गुगल प्लसवरून काढून टाकण्याच्या दिशेने पाऊले टाकत आहे. कंपनीने गुगल प्लसची वाटणी करण्याची मोठी घोषणा केली आहे.
आतापर्यंत गुगलच्या विविध सुविधांना सेवा द्यायला गुगल प्लसची प्रोफाईल असणे जरूरीचे आहे. पण भविष्यात असे राहणार नाही.
सगळ्या गुगल सेवेसाठी एकच अकाऊंट असले तर त्याचा वापर करणे सुकर जाईल, अशी लोकांची मागणी आहे. हे वक्तव्य गुगलचे उपाध्यक्ष ब्रेडली होरोवित्झ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.