'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली

गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय. 

Updated: Jul 30, 2015, 10:33 AM IST
'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली title=

नवी दिल्ली : गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय. 

गूगलच्या डुडलद्वारे ह्यात नसलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली, महत्त्वपूर्ण निमित्त किंवा वर्धापन दिन अनोख्या पद्धतीनं हायलाईट केले जातात. 

यापूर्वी गूगलनं डुडलद्वारे सिनेनिर्माता सत्यजीत, गणित विषयांतील तज्ज्ञ शकुंतला देवी तसंच अभिनेते राज कपूर यांच्यासमवेत अनेक मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केलीय. 

कलाम यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साध्या पद्धतीनंच व्यतीत केलं. हाच साधेपणा दर्शवण्यासाठी गूगलनं कोणत्याही डूडलचा उपयोग न करता सर्च टॅबच्या खाली केवळ एक काळी रिबिन दाखवत कलाम यांना आपली श्रद्धांजली अर्पण केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.