नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजीन गूगलने, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे, गुगलने होमपेजवर काळ्या रंगाची रिबन लावून आदरांजली दिली आहे.
बुधवारी गुगलने आपल्या होमपेजवर सर्च बटनच्या खाली काळ्या रंगाच्या रिबनचे चित्र दाखवून आदरांजली वाहिली आहे.
डॉ. कलाम यांचे सोमवारी निधन झाले. त्यानंतर देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मिडियाही "कलाम‘मय झाली आहे. फेसबुक, ट्विटर, तसेच व्हॉटस् ऍपद्वारे कलाम यांचे विचार तसेच छायाचित्र, भाषणांची व्हिडिओ शेअर करण्यात येत आहेत.
कलाम यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून 'इन मेमरी ऑफ डॉ. कलाम' या नावाने कार्यान्वित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी कलाम हे कोट्यवधी भारतीयांसाठी प्रेरणा स्रोत असल्याचे म्हणत शोक व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.