पेरिस/फ्रँकफर्ट: फ्रान्सची एका मोठ्या बँकेनं ट्विटरसोबत डील करण्याती तयारी केलीय. यानंतर या बँकेचे ग्राहक ट्वीट करून मग पैसे ट्रांसफर करू शकतील. ग्राहकांच्या संख्येच्या हिशोबानं दुसऱ्या नंबरवर असलेली बँक बीपीसीईचा हा निर्णय ट्विटरच्या अशाच निर्णयासोबत आलाय.
सोशल नेटवर्किंगच्या दिग्गजांनी अॅड प्रचारानं होणाऱ्या कमाई ऐवजी पैसे कमविण्याच्या संधींचा शोध घेत हा रस्ता निवडलाय. ज्याअंतर्गत ग्राहकांना पैसे ट्रांसफर करण्याची सुविधा मिळेल आणि ट्विटरचीही कमाई होईल.
ट्विटर पण फेसबुक आणि अॅपलसारखी पेमेंट सर्व्हिसच्या क्षेत्रात आपलं पाऊल ठेवणार आहे. गेल्या महिन्यात फ्रांसच्या या बँकेनं आपण ग्राहकांना ट्विटरद्वारे मनी ट्रांसफरची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं वक्तव्य केलं होतं.
बीपीसीईच्या मोबाइल युनिटची सुविधा एस-मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलस चॅटिलोननं सांगितलं की, एस-मनी फ्रांसच्या नागरिकांसाठी पैसे ट्रांसफर करण्याचा एक नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक कोणत्याही बँकेच्या ग्राहकाला पैसे पाठवू शकेल. विशेष म्हणजे यात ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याच्या अकाऊंटची कोणतीही माहिती आवश्य नसेल. हे काम फक्त ट्विटद्वारे होऊ शकेल, असंही त्यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.