बटण दाबा आणि म्हणा 'आय अॅम व्होटर'!

महाराष्ट्र आणि हरियाणात मतदानासाठी अवघे काही तास उरलेत. मतदार राजानं पुढं येऊन आपला हक्क बजावावा, यासाठी आता ‘फेसबुक’ही प्रोत्साहन देताना दिसतंय.

Updated: Oct 14, 2014, 01:06 PM IST
बटण दाबा आणि म्हणा 'आय अॅम व्होटर'! title=

मुंबई : महाराष्ट्र आणि हरियाणात मतदानासाठी अवघे काही तास उरलेत. मतदार राजानं पुढं येऊन आपला हक्क बजावावा, यासाठी आता ‘फेसबुक’ही प्रोत्साहन देताना दिसतंय.

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन फेसबुकनं एक मोहीम राबविलीय. तरुणाईमध्ये असणारं फेसबुकचं वेड कॅश करण्यासाठी फेसबूकवर विधानसभा उमेदवारांची माहिती, स्थानिक विषय आणि निवडणुकांविषयी अधिकाअधिक अपडेट्स फेसबूकने दिले आहे. त्यासाठी 'आय एम वोटर मेगाफोन' ही मोहीम फेसबुकनं राबविलीय. 

१८ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या फेसबुक युजर्सला त्यांच्या होम पेजवर सर्वात टॉपवर मतदानाविषयी फीड देण्याचा प्रयत्न केला आहे. यात मतदारांना मतदान सुरू झाल्यापासूनचे अपडेट्स मिळतील. यामध्ये, एखाद्या युजरला मतदानाविषयी आपला अनुभवही टाईमलाईनवर पोस्ट करता येणार आहे. नेटीझन्सना आपण मतदानाचं आपलं कर्तव्य बजावलंय, हे सांगून इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहन देण्याची चांगली संधी आहे.

टाईमलाईवर अनुभव किंवा स्टोरी अपडेट कशी कराल...

1) यासाठी तुम्ही लाईफ इव्हेंटवर क्लिक करा

2) ट्रॅव्हल अॅन्ड एक्सपिरिअन्स अॅन्ड व्होटेड क्लिक करा.

3) तारीख आणि फोटोची नोंद करा.

या पर्यायाद्वार तुम्ही तुमचा अनुभव शेअर देखील करण्याची संधी मिळेल.

लीडर बोर्ड

महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यातील निडवणुकांसाठी फेसबुकचा वापर राजकीय पक्षांनी कशाप्रकारे केला आहे. याबाबातील सर्वा माहिती आपल्याला लीडर बोर्डवर मिळेल. विषेशत: या राज्यातील विविध फेसबुक कम्युनिटीद्वारे निवडणुकांची चर्चा कशी झाली, याबाबतची माहितीही मिळेल. या सर्व अपडेट्ससाठी http://on.fb.me/Zk7cKI लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल.

उमेदवारांविषयी माहिती

तुम्ही ज्या परिसरात राहता त्या ठिकाणी कोणते उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्याची नावे याबद्दलची सर्वा माहिती तुम्ही *325*25# डायल करा. त्यानंतर Know Your Neta ही मोफत सेवा एअरटेल, आयडिया, एअरसेल, टाटा आणि युनिनॉर ग्राहकांना वापरता येईल.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.