नवी दिल्ली : आता तुम्ही व्हाट्अॅपवर मॅसेजबरोबर व्हॉईस कॉलिंग करु शकणार आहात. तेही फुटकात. व्हाट्सअॅपवर ही चांगली सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस व्हाट्सअॅपच्या सीईओ जान कॉमने व्हाट्सअॅपवर व्हाईस कॉलिंग फिचर्समध्ये ही गोष्ट सांगण्यात आली आहे.
कंपनीच्या मते फ्री व्हाईस कॉलिंग सुविधा या वर्षातच सुरु होईल. अॅंड्राईड, आयओएस, ब्लॅकबेरी आणि नोकिया फोनवर उपलब्ध होणार आहे. व्हाट्सअॅप ही पहिली कंपनी नाही की, फ्री व्हाईस कॉलिंग सुविधा देणारी आहे.
या आधी व्हीवर, लाईनने ही सुविधा दिली आहे. याचा फायदा लाखो ग्राहक घेत आहेत. फेसबुक अधिकृत व्हाट्सअॅपच्या मते 15 टक्के ट्रॅफिक वाढले. भारतात व्हाटस्अॅपचे 50 मिलियन अॅक्टीव्ह युजर्स आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.