लंडन: फेसबुक यूजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. फेसबुकनं आपल्या 7 लाख यूजर्सच्या अकाऊंट्समध्ये घुसखोरी केल्याचं खुद्द फेसबुकनंच कबुल केलंय.
फेसबुक यूजर्सच्या अकाऊंटमध्ये हेराफेरी केल्याचं उघड झालं. मात्र हे आम्ही यूजर्संना अधिक चांगली सेवा देण्यासाठी केल्याचं फेसबुकनं म्हटलंय. सोबतच त्यांनी याबद्दल माफीही मागितलीय.
या प्रकाराबद्दल फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरील सँडबर्ग यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. १.२ अब्ज यूजर्स असलेल्या एखाद्या सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी जे प्रयोग केले जातात, तितकंच याचं महत्त्व असून केवळ उत्तम सेवेसाठीच हा प्रकार केल्याचं त्यांनी म्हटलंय.
फेसबुकवरील यूजर्सचं खासगीपण जपणं, हे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्याचंही शेरील सँडबर्ग म्हणाले. मात्र हा प्रकार इंग्लंडमध्ये अत्यंत गांभीर्यानं घेण्यात आला असून, खासगीपणाच्या मुद्द्यावरून कंपनीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.