'नरेंद्र मोदींचा आईसोबतचा फोटो माझा फेवरीट' - फेसबुक सीओओ

फेसबुकवर जगातील लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आहेत.

Updated: Jul 2, 2014, 09:32 PM IST
'नरेंद्र मोदींचा आईसोबतचा फोटो माझा फेवरीट' - फेसबुक सीओओ title=

नवी दिल्ली : फेसबुकवर जगातील लोकप्रिय व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आहेत.

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत फेसबुकचे सीईओओ सैंडबर्ग म्हणाल्या, "आपल्या आईसोबत नरेंद्र मोदी यांचा फेसबुकवर जो फोटो आहे, तो माझा फेवरीट फोटो आहे". 

ओबामांना 4 कोटी फॅन्स आहेत. नरेंद्र मोदी यांना 1 कोटी 88 लाख फॉलोअर्स आहेत, मोदी हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

फेसबुकचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) शेरयल सैंडबर्ग यांनी ही माहिती दिली आहे.

सैंडबर्ग याच्यावर म्हणतात, मला आनंद आहे की, भारतातील राजकारणी आता सोशल मीडियाचं महत्व समजू लागले आहेत.
 
शेरयल सैंडबर्ग म्हणतात, हा कमालीचा अनुभव आहे की, लोकसभा क्षेत्रातील लोकांशी तुम्ही सरळ संवाद साधू शकतात. भारतीय निवडणुकीत जे काही झालं ते कमालीचं होतं.
 
सैंडबर्ग पुढे म्हणाल्या, भारतात 10 कोटी पेक्षा जास्त फेसबुक युझर्स आहेत. अमेरिकेनंतर भारतात फेसबुकचे सर्वात जास्त युझर्स आहेत. अॅक्टीव्ह युझर्स हे फेसबुकसाठी भारतातलं मोठं मार्केट आहे.

मात्र कोणखी काही कोटी लोक फेसबुकशी जोडले गेलेले नाहीत, आणखी करोडो लोकांना फेसबुकसोबत जोडण्याचं आमच्या समोरचं पहिलं आवाहन आहे.
 
काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती, यानंतर पुणे शहरात तणाव निर्माण झाला. 

यात एका आयटी प्रोफेशनलची हत्या करण्यात आली, या मुद्यावर बोलतांना फेसबुकचे सीओओ सैंडबर्ग म्हणाल्या, फेसबुकवर हिंसा भडकवणारी कोणतीही पोस्ट सहन केली जाणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.