आयफोन ६ चा स्फोट, युवक जखमी

रोहटकमध्ये सोमवारी अॅपला आयफोन ६चा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात तरुण जखमी झालाय तर मोबाईल पूर्णपणे जळून खाक झालाय. हरेंद्र दहिया असं या तरुणाचं नाव आहे. 

Updated: Jan 5, 2016, 04:35 PM IST
आयफोन ६ चा स्फोट, युवक जखमी title=

रोहतक : रोहटकमध्ये सोमवारी अॅपला आयफोन ६चा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात तरुण जखमी झालाय तर मोबाईल पूर्णपणे जळून खाक झालाय. हरेंद्र दहिया असं या तरुणाचं नाव आहे. 

हरेंद्रने ५२ हजार रुपयांना आयफोन ६ विकत घेतला. हातात घेतल्यानंतर अचानकपणे या फोनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे या तरुणांच्या हाताला मोठी जखम झालीय. तसेच फोनही जळून खाक झाला.

दरम्यान, या प्रकरणी तरुणाने कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केलीये.