या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून

आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?

Updated: Sep 29, 2016, 11:56 AM IST
या प्रसिद्ध उद्योगपतींच्या मुलांचा पगार किती?...घ्या जाणून title=

मुंबई : आपल्या देशात असे अनेक प्रसिद्ध उद्योगपती आहेत ज्यांची मुले आपल्याच कंपनीत काम करताना व्यवसाय पुढे नेण्यास मदत करत आहेत. या मुलांना कुटुंबाच्या व्यवसायामध्ये योग्य ते पद आणि सॅलरीही दिली जाते. तुम्हाला माहीत आहे का अदानी, अंबानी यांची मुले किती कमावतात ते?

भारतातील प्रसिद्ध उद्योगपतींमध्ये पहिले नाव येते ते मुकेश अंबानी यांचे. मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचे पॅकेज निर्धारित करण्यात आलेले नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये टेलिकॉम आणि रिटेल वेंचर्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावतायत. 

गुजरातचे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा करन याला अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचा सीईओ बनवण्यात आलेय. करनचे वार्षिक पॅकेज 1.5 कोटी रुपये आहे. 

अनिल अंबानीचा मुलगा अनमोल अंबानी अंबानी याची महिन्याची सॅलरी 10 लाख रुपये इतकी आहे. वार्षिक पॅकेज 1.2 कोटी रुपये आहे. 

टीव्हीएस मोटर्सचे वेणु श्रीनिवासनचा मुलगा सुदर्शन वेणुकडे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टरचे पद सोपवण्यात आलेय. 2015-16 या वर्षात त्याचे पॅकेज 9.59 कोटी रुपये होते.