पंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.

Updated: Sep 30, 2015, 02:11 PM IST
पंतप्रधान मोदींना भेटले म्हणून झुकरबर्गला पाठवले हँड सॅनिटायझर   title=

न्यूयॉर्क: फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनं नाराज झालेल्या काही भारतीय अमेरिकन नागरिकांनी निषेध नोंदवलाय. यासाठी एका एक्टिविस्ट ग्रुपनं झुकरबर्गला मोदींच्या भेटीनंतर हात धुण्याचा सल्ला दिलाय. सोबतच तब्बल 250 बॉटल्स हँड सॅनिटायझर पाठवल्या आहेत.

इंटरनेटवर 'झुक, वॉश युवर हँड्स' नावानं कँपेन चालवणाऱ्या या ग्रुपनं झुकरबर्गसाठी लिहिलं, मोदींचे हात रक्तानं माखलेले आहेत आणि त्यांना भेटल्यानंतर हे हात तू सॅनिटायझरनं चांगले धुवून घे. याचा इशारा 2002च्या गुजरात दंगलींकडे आहे.

आणखी वाचा - पाहा व्हिडिओ : मोदी आणि कॅमेऱ्यामध्ये कोणीच येऊ शकत नाही, झुगरबर्गही नाही

प्रत्येक बॉटलवर दंगल पीडिताचं नाव

मोदी यांनी सिलिकॉन व्हॅलीला असलेल्या फेसबुक हेडक्वॉर्टरला भेट दिली. तिथं मार्क झुकरबर्गनं मोदींची मुलाखतही घेतली. अलायन्स फॉर जस्टिस अँणड अकाउंटेबिलिटी (एजीए) या संघटनेनं आरोप लावलाय की, मोदी 2002 मधील गुजरात दंगलीचे दोषी आहेत. दंगलीत जवळपास 2000 मुस्लिम ठार झाले होते. ग्रुपनं झुकरबर्गला पाठवलेल्या सॅनिटायझरच्या प्रत्येक बॉटलवर दंगल पीडितांची नावं लिहिली आहेत. 

या ग्रुपनं ऑनलाइन वेबसाइटवर संदेश लिहत लोकांना झुकरबर्गला सॅनिटायझर पाठविण्याचं आवाहन केलंय. 

आणखी वाचा - भारतात मंदिरात जाऊन बुडणाऱ्या फेसबूकला वाचविले - झुकरबर्ग

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.