गूगल ऑफिसमध्ये तुम्हांलाही काम करायला आवडेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गूगल ऑफिसला भेट दिली ते आतून कसे आहे. गूगल ऑफिस हे एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा काही कमी नाही. 

Updated: Sep 30, 2015, 01:40 PM IST
गूगल ऑफिसमध्ये तुम्हांलाही काम करायला आवडेल title=
सौजन्य : google office

कॅलिफोर्निया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गूगल ऑफिसला भेट दिली ते आतून कसे आहे. गूगल ऑफिस हे एखाद्या पर्यटन स्थळापेक्षा काही कमी नाही. 

गूगलच्या ऑफीसमध्ये काम करणे हे अनेकांचे स्वप्न असतं. गूगलच्या ऑफिसमध्ये तुम्हांला कामासोबत अशा काही सुविधा मिळतात, त्या तुम्ही कामाच्या ठिकाणी विचारातही करू शकत नाही. 

जिम, मसाज सेंटर, बास्केट बॉल कोर्ट, हॉलिबॉल कोर्ट, रेस्ट रूम, रिक्रिएशन सेंटर, लहान मुलांसाठी वेगळा विभाग, झोपण्यासाठी जागा, खान पानाची उत्तम जागा.. या आणि अशा बऱ्याच गोष्टी या गूगल ऑफीसमध्ये आहेत. 

अमेरिकेतील गूगल ऑफिस हे तीन स्टेडिअम येवढ्या मोठ्या जागेत आहे. वरच्या मजल्यावरून खाली जाण्यासाठी घसरगुंडी आहे किंवा अग्निशामक दलात जसे पोल बारच्या मदतीने खालच्या मजल्यावर जाता येते तशी व्यवस्था आहे. एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत जाण्यासाठी सायकल आहेत. 

गूगलचे स्वतःचे हॉस्पिटल आहे. त्यात मोफत इलाज केला जातो. तसेच सर्व्हिस काळात एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाले तर त्याच्या परिवाराला पुढील १० वर्षाचा पगार दिला जातो. 

हे तुम्हांला अतिशोक्ती वाटते का तर हा व्हिडिओ पाहा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.