वा! जयपूरच्या आस्थाला फेसबुककडून 2.1 कोटींची ऑफर

आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना लाखांची, कोटींची सॅलरी पॅकेजची ऑफर मिळते याबद्दल आपण ऐकतो. मात्र आश्चर्य तेव्हा असतं जेव्हा ही कोट्यावधींची ऑफर हे विद्यार्थी लाथाडतात. कारण त्यांचं ध्येय काही वेगळंच असतं. 

Updated: Dec 9, 2014, 01:43 PM IST
वा! जयपूरच्या आस्थाला फेसबुककडून 2.1 कोटींची ऑफर title=

जयपूर: आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना लाखांची, कोटींची सॅलरी पॅकेजची ऑफर मिळते याबद्दल आपण ऐकतो. मात्र आश्चर्य तेव्हा असतं जेव्हा ही कोट्यावधींची ऑफर हे विद्यार्थी लाथाडतात. कारण त्यांचं ध्येय काही वेगळंच असतं. 

पण सध्या गुलाबी शहर जयपूरची एक तरुणी सध्या चर्चेत आहे कारण तिला सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकनं 2.1 कोटी रुपयांच्या सॅलरी पॅकेजची ऑफर दिली आहे.  

20 वर्षीय आस्था अग्रवाल सध्या आयआयटी मुंबईतून ग्रॅज्युएशन करतेय. नुकतंच फेसबुकनं तिला 2.1 कोटींची ऑफर दिलीय. आस्थाचं म्हणणं आहे की, या यशामागे तिच्या शाळेच्या शिक्षकांचं योगदान मोठं आहे. आस्थाला अजिबात ही अपेक्षा नव्हती की तिला एवढ्या मोठ्या पॅकेजची ऑफर मिळेल. 

सध्या आस्थानं आपल्या या यशाला चॅलेंज म्हणून घेतलंय. आस्थानं जयपूरच्या सेंट झेव्हिअर्स स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलंय. तिला 12वीत 98 टक्के मार्क्स मिळाले होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.