www.24taas.com, ठाणे
वाहनांचं बनावट इन्शुरन्स बनवणाऱ्या टोळीला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी गजाआड केलीये. एका सायबर कँफेमध्ये टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचे इन्शुरन्स काढून वाहनाधारकांची ही टोळी फसवणूक करायची.
या टोळीचा म्होरक्या आरटीओ एजेंट असल्याचं स्पष्ट झालंय. ऍनिमेशनची पदवी असलेला तुषार बागुल, बारावी शिकलेले कल्याणचे दोन आरटीओ एजंट अनिल कलानी आणि कुमार भूरव यांना पोलिसांनी अटक केलीये. या टोळीनं हजारो लोकांची फसवणूक केलीये. आरोपी तुषार बागुलच्या सायबर कँफेमध्ये विमा कंपन्यांचे बनावट रबर स्टॅम्प, अर्ज, प्रमाणपत्रे सापडली आहेत.
आतापर्यंत त्यांनी एक हजारपेक्षा जास्त बनावट इन्सुरन्स प्रमाणपत्र बनवली आहेत. कल्याण आरटीओमधील काही कर्मचाऱ्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करतायेत.