मानवच सर्वाधिक बुद्धिमान का?

शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 21, 2012, 08:15 AM IST

www.24taas.com, लंडन
शास्त्रज्ञांना मानवाच्या बुद्धिमान होण्याचं कारण आता लक्षात आलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांना प्रोटिन्समध्ये असलेल्या डीयूएफ 1220 या कणांचा शोध लागला आहे. मानवी शरीरातील प्रोटिन्समध्ये या कणांचा असणारा साठा मानवाला बुद्धिमान बनवतो.
विश्वभरातील प्राणीमात्रांमध्ये माणूस हाच सगळ्यांत बुद्धिमान प्राणी मानला जातो. इतर प्राणी मानवापेक्षा शक्तिमान असूनही पृथ्वीवर माणसाचीच सत्ता राहाण्याचं प्रमुख कारण म्हणजे मानवाकडे असणारी बुद्धी. या बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने आपली प्रगती केली आणि तो इतर प्राण्यापेक्षा वेगळा ठरला.
डीयूएफ 1220 प्रोटिन्समधील एक डोमेन आहे. या कणांची संख्या मानवी शरीरात इतर जनावरांपेक्षा अधिक आहे. प्रोफेसर जेम्स सिकेला यांनी यासंदर्भात सांगितलं, की या संशोधनामुळे मानवी मेंदूच्या व्यापक विस्तारावर अधिक प्रकाश पडला आहे. यावर अधिक संशोधन केल्यास मानवाचा बुद्ध्यांक वाढवण्याचे तंत्रही विकसित होण्याची शक्यता आहे.