‘लिनोव्हो’च्या स्वस्त स्मार्टफोन्सचा धूमधडाका...

मोबाईल निर्माती कंपनी ‘लिनोव्हो’ लवकरच स्मार्टफोन्सच्या बाजारात धूम उडवून देण्यास सज्ज झालीय. कंपनीचे नवे हँडसेट एस-६५०, ए-८५९ आणि एस-९३० लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 5, 2014, 04:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईल निर्माती कंपनी ‘लिनोव्हो’ लवकरच स्मार्टफोन्सच्या बाजारात धूम उडवून देण्यास सज्ज झालीय. कंपनीचे नवे हँडसेट एस-६५०, ए-८५९ आणि एस-९३० लवकरच बाजारात धुमाकूळ घालण्याच्या तयारीत आहेत.
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे हे नवीन हँडसेट लवकरच काही निवडक देशांत लॉन्च होणार आहेत. या मोबाईलची भारतात किंमत काय असेल याबद्दल अजून काहीही घोषणा केलेली नाही. परंतु, हे स्मार्टफोन्स २३ हजारांच्या आतच ग्राहकांना उपलब्ध होतील, अशी आशा कंपनीनं व्यक्त केलीय. या तिन्ही स्मार्टफोन्समध्ये १.३ गेगाहर्टझ क्वॉडकोर प्रोसेसर असेल.

लिनोव्हो एस-६५०
*१.३ गेगाहर्टझ एमटी ६५८२ क्वॉड कोर प्रोसेसर
*४.७ इंचाची स्क्रीन QHD रिझोल्युशन
*कॅमेरा – ८ मेगापिक्सल
*फ्रंट VGA कॅमेरा
*इंटरनल स्टोरेज : ८ जीबी
*एक जीबी रॅम,
*४.२ जेलीबीन ऑपरेटींग सिस्टम,
*२००० mAH ची बॅटरी

लिनोव्हो ए-८५९
*१.३ गेगाहर्टझ एमटी ६५८२ क्वॉड कोर प्रोसेसर
*५ इंचाची स्क्रीन IPS स्क्रिन रिझोल्युशन
*कॅमेरा – १२८० X ७२० पिक्सिल
*फ्रंट कॅमेरा – १.६ मेगापिक्सल
*इंटरनल स्टोरेज : ८ जीबी
*एक्स्पान्डेबल मेमरी : ३२ जीबी
*एक जीबी रॅम
*२२५० mAH ची बॅटरी
लिनोव्हो एस-९३०
*१.३ गेगाहर्टझ एमटी ६५८२ क्वॉड कोर प्रोसेसर
*स्क्रिन – ६ इंच
*स्क्रिन रिझोल्युशन १२८० X ७२० पिक्सल
*रिअर कॅमेरा – ८ मेगापिक्सल
*फ्रंट कॅमेरा – ३००० mAH,
*१० तासांचा टॉकटाईम

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.