www.24taas.com, झी मीडिया, लंडन
कधी तुमच्या मनात आलं की जाणून घ्यावं, आपल्या आजी-आजोबांच्या लग्नात पाऊस पडत होता का? की त्यावेळी आकाशात ढगांची गर्दी होती. किंवा तुमचे आई-वडील जेव्हा पहिल्यांदा महाबळेश्वरला गेले, तेव्हा पाऊस पडत होता की बर्फ हे जाणून घेण शक्य नव्हतं, पण आता ते शक्य झालयं आता कुठल्यावेळी कुठलं हवामान होतं. पाऊस होता का? या साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळविता येणार आहे.
इंग्लंडच्या नॉरविच येथील युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजलियाच्या शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे हे शक्य झालयं. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट एंजलियाच्या शास्त्रज्ञांनी १८५० पर्यंतच्या वैश्विक तापमानाचे रेकॉर्ड तयार केले आहेत. गूगल अर्थमध्येही हे तंत्रज्ञान असणार आहे. नवीन अॅपच्या माध्यमातून जगभरातील ६००० हवामान संस्थाशी संपर्क साधता येणार आहे. हवामानाच्या घडलेल्या प्रत्येक घडामोडींची नोंद पाहणे ह्या अॅपमुळे शक्य होणार आहे.
नवीन अॅप्लीकेशनमध्ये गूगल अर्थच्या नकाशावर कुठल्याही ठिकाणाला झूम केल्यास तेथल्या हवामान केंद्राचा डाटाबेस तुमच्या मोबाईल किंवा डिव्हाईसवर उपलब्ध होईल, फक्त एक क्लिक करण्याचा अवकाश आणि हवामानाची माहिती तुमच्या हातात असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.