आता सुप्रिम कोर्टच्या केसेसची माहिती एका क्लिकवर

सध्याचा जमाना स्मार्ट फोनचा आहे... आता फोनमधल्या या अॅपची भुरळ सुप्रिम कोर्टालाही पडलीय. ज्यांच्या-ज्यांच्या केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत... त्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सुप्रिम कोर्टामधल्या केसेसची सगळी माहिती आता एका अॅपवर उपलब्ध होणार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 7, 2014, 08:42 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
सध्याचा जमाना स्मार्ट फोनचा आहे... आता फोनमधल्या या अॅपची भुरळ सुप्रिम कोर्टालाही पडलीय. ज्यांच्या-ज्यांच्या केसेस सध्या कोर्टामध्ये सुरू आहेत... त्या सगळ्यांसाठी ही चांगली बातमी आहे. सुप्रिम कोर्टामधल्या केसेसची सगळी माहिती आता एका अॅपवर उपलब्ध होणार आहे.

कराग्रे वसते अँड्रॉईड
करमध्ये व्हॉटसअप
करमूले तू फेसबुकम
प्रभाते मोबाईलदर्शनम....

याच श्लोकानं आता दिवसाची सुरुवात होते.... प्रत्येक क्षेत्राच्या गरजा ओळखून विविध अॅप्स डिझाईन करण्यात आलीयत. आता या अॅप्सची भुरळ सुप्रिम कोर्टालाही पडलीय. काळाबरोबर एक पाऊल पुढे राहत सुप्रिम कोर्टानंही आता हायटॆक जमान्यामध्ये अपडेट राहण्यासाठी अशाच एका अॅपची मदत घेतलीये. सुप्रिम कोर्टाच्या मागणीवरुन सी-डॅक म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कम्प्युटिंगनं हे अॅप विकसित केलंय. या नव्या अॅपमुळं सुप्रिम कोर्टातल्या कामाची माहिती देणारा डिस्प्ले बोर्ड, खटल्याची स्थिती दाखवणारे केस स्टेटस... विविध प्रकरणांवरच्या सुनावण्यांचं टाईमटेबल, सुनावण्यांसाठीचा कोर्ट नंबर आणि विविध निकाल अशी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
त्यामुळे वकिलांसह पक्षकारालाही याचा फायदा होणार आहे.
वकिलांनीही या सुप्रिम कोर्टाच्या अॅपचं स्वागत केलंय. अॅन्ड्रॉईड, आय स्टोर आणि विंडोज अशा तिन्ही ओएस सिस्टिमवर हे अॅप ऑपरेट करता येणारेय. सुप्रिम कोर्टाच्या कामकाजामध्ये अजूनही तारीख पे तारीख कायम असली तरी त्याची माहिती मात्र आता एका क्लिकवर मिळणार आहे.
पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.