युवराजनंतर एकाच ओव्हरमध्ये पोलार्डने मारले सहा सिक्सर

मुंबई इंडियन्समधून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डला धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखलं जातं. याचाच प्रत्यय येथे आला. त्याने एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकत संघासाठी विजय खेचून आणला.

Reuters | Updated: Dec 19, 2014, 08:07 PM IST
युवराजनंतर एकाच ओव्हरमध्ये पोलार्डने मारले  सहा सिक्सर title=

अॅडलेड : मुंबई इंडियन्समधून खेळणाऱ्या किरॉन पोलार्डला धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखलं जातं. याचाच प्रत्यय येथे आला. त्याने एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्स ठोकत संघासाठी विजय खेचून आणला.

आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स, बांग्लादेश प्रीमिअर लीग आणि इंग्लंड डोमेस्टिक क्रिकेटमध्येही तो खेळतो. युवराज सिंगने एकाच ओव्हरमध्ये सहा सिक्सर ठोकत दमदार खेळी केली होती. आजही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहे. युवीचा हा विक्रम वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डने मोडला.

ऑस्ट्रेलियन टी-20 क्रिकेट टूर्नामेंट बिग बॅश लीगला आजपासून सुरुवात होत आहे. त्याआधीच टी-20 टूर्नामेंट रोमांचक असेल याचा प्रत्यय आलाय. पोलार्डने प्रॅक्टिस मॅचमध्ये ही खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. अॅडलेड स्ट्रायकर्स संघाकडून खेळतान पोलार्डने ही कमाल केली. फिरकी गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये पोलार्डने सहा उत्तुंग सिक्स ठोकले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.