मेलबर्न : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज सिंगला बॅटिंग करण्याची संधी न दिल्याने त्याची भावी जोडीदार हेझल कीच चांगलीच भडकली. युवराजला संधी न दिल्याने तिने ट्विटरवरुन तिचा राग व्यक्त केला. तिच्या ट्विटरनंतर अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला चुकीचे ठरवले.
दुसऱ्या सामन्यात युवराजला बॅटिंगची संधी मिळाली नाही. यामुळे वैतागलेल्या हेझलने ट्विटरवर संघात स्थान मिळूनही युवराजला बॅटिंगची संधी का मिळाली नाही असा सवाल केला. तसेच अखेर लोकांना हे कधी समजेल की युवराजला बॅटिंगसाठी एक चान्स मिळाला आहे, असे म्हटले होते.
मात्र तिच्या या ट्विटरवर वादंग निर्माण झाल्याने तिने हे ट्विट डिलीट करुन टाकले. काहींनी यावरुन हेझलवर टीका केली तर काहींनी तिच्या समर्थनार्थ ट्विट केले.