... जेव्हा एका 'आफ्रिकन'नं दक्षिण आफ्रिकेला हरवलं

न्यूझीलंडनं वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून फायनलमध्ये धडक मारली. मॅच दरम्यान अशी वेळ होती, जेव्हा मॅच न्यूझीलंडच्या हातून दक्षिण आफ्रिकेच्या हाती जात होता. तेव्हा त्यांच्या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू ग्रँट इलियॉटनं अखेरपर्यंत खेळत टीमला विजय मिळवून दिली. कुणाला माहिती होतं दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या खेळाडूकडूनच दक्षिण आफ्रिकन टीमचं स्वप्न धुळीला मिळेल. 

Updated: Mar 25, 2015, 12:09 PM IST
... जेव्हा एका 'आफ्रिकन'नं दक्षिण आफ्रिकेला हरवलं title=

ऑकलँड: न्यूझीलंडनं वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून फायनलमध्ये धडक मारली. मॅच दरम्यान अशी वेळ होती, जेव्हा मॅच न्यूझीलंडच्या हातून दक्षिण आफ्रिकेच्या हाती जात होता. तेव्हा त्यांच्या टीमचा ऑलराऊंडर खेळाडू ग्रँट इलियॉटनं अखेरपर्यंत खेळत टीमला विजय मिळवून दिली. कुणाला माहिती होतं दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या या खेळाडूकडूनच दक्षिण आफ्रिकन टीमचं स्वप्न धुळीला मिळेल. 

न्यूझीलंडचं वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचण्याचं स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्या ऑलराऊंडर खेळाडू ग्रँट इलियॉटनं... इलियॉटचा जन्म मूळचा दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गला झाला. इलियॉटनं पाचव्या बॉलमध्ये जेव्हा षटकार मारला, तेव्हा संपूर्ण स्टेडियम उत्साहात आणि फटाकांच्या आतषबाजीनं न्हावून निघाला. 

इलियॉटनं मॅच विनिंग खेळी खेळली. इलियॉटनं आपल्या खेळीमध्ये ७३ बॉल्सचा सामना केला. ज्यात त्यानं तीन षटकार आणि सात चौकारच्या मदतीनं ८४ रन्स बनवले आणि दक्षिण आफ्रिकेच्या सर्वात फास्ट बॉलर डेल स्टेनच्या बॉलवर विजयाचा षटकार मारला.

वर्ल्डकप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंडला ४० वर्षांपासून वाट पाहावी लागलीय. यापूर्वी न्यूझीलंड सहा वेळा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये गेलीय. मात्र तेव्हा टीमला फायनलमध्ये जागा मिळविण्यात अपयश आलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.