1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असतानाही 'ही' बडी कंपनी भारतातून घेणार एक्झिट; नेमकं कुठं बिनसलं?

Auto  News : रोजगारावर होणार परिणाम; 1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असणारी आणखी एक कंपनी भारताबाहेर जाण्याच्या तयारीत   

सायली पाटील | Updated: Jul 1, 2024, 06:40 PM IST
1,66,75,09,00,000 रुपयांची गुंतवणूक असतानाही 'ही' बडी कंपनी भारतातून घेणार एक्झिट; नेमकं कुठं बिनसलं?  title=
Volkswagen might Sell Stake Rope In Local Partner latest news

Auto  News : मागील काही दिवसांमध्ये भारतातून मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांनी एक्झिट घेतली. ज्यामागोमाग आता ऑटोमोबाईल क्षेत्रात कार्यरत असणआऱ्या काही बड्या कंपन्यांनीही भारतातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतल्यामुळं मोठ्या अडचणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे भारतातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत असणाऱ्या या कंपनीमुळं अनेकांच्या रोजगारावरही प्रश्न निर्माण होण्याची अगदी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत. 

कोणती कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? 

जर्मनीतील आघाडीची कंपनी फोक्सवॅगन  (Volkswagen) येत्या काळात भारतीय बाजारपेठेतून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. भारतीय बाजारपेठेत असणारी भागिदारी फोक्सवॅगन स्थानिक व्यवसाय साथीदाराला विकणार असून त्यासंदर्भातील चर्चांना आता उधाण आलं आहे. भारतामध्ये फोक्सवॅगनकडून दोन अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक करूनही ही कंपनी भारतात अपेक्षित यश मिळवू शकलेली नाही. त्यामुळंच देशातून एक्झिट घेण्यासाठीची ही तयारी केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : सुनीता विलियम्सना धोका...  NASA ची मोठी अपडेट 

कंपनीतील एका उत्तस्तरीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार सध्या कार मॉडेल्सना मिळणारा कमी प्रतिसाद पाहता येत्या काळात हा प्रतिसाद कसा वाढवता येईल यावर भर दिला जाणार आहे. फक्त भारतातच नव्हे, तर युरोपातही सध्या कंपनी अस्तित्वाची लढाई लढताना दिसत आहे. भारतीय बाजारपेठेतील एकंदर चित्र पाहता, इथं हायब्रिड वाहनांवर किमान कराची मागणी कंपनीनं केली असून, सातत्यानं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या ग्रीन करांमध्ये बदल होत असतील, तर अशा वेळी कंपनीकडून इव्ही खरेदीसाठी रणनिती आखली गेल्यास ही रणनिती काहीसे अनपेक्षित निकाल देईल असं सांगितलं जात आहे. तेव्हा आता फोक्सवॅगन नेमकी भविष्यात कोणती रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.