'टीम इंडियाच्या हाती लिहलाय न्यूझीलंडचा पराभव'

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता रोमांच उभा राहिला आहे, यात बॉलीवूडच्या स्टारनाही आता रहावत नाहीय, मिस्टर परफेक्ट आमीर खानने देखिल पहिल्या सेमी फायनलचा सामना पाहिलाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला गेला. आमीरने न्यूझीलंडचा बॅटसमन ग्रँट इलियॉटची तारिफ केली आहे, आमीरने इलियॉटला शानदार खेळाडू म्हटलंय.

Updated: Mar 25, 2015, 11:18 AM IST
'टीम इंडियाच्या हाती लिहलाय न्यूझीलंडचा पराभव' title=

मुंबई : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आता रोमांच उभा राहिला आहे, यात बॉलीवूडच्या स्टारनाही आता रहावत नाहीय, मिस्टर परफेक्ट आमीर खानने देखिल पहिल्या सेमी फायनलचा सामना पाहिलाय दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात हा सामना खेळला गेला. आमीरने न्यूझीलंडचा बॅटसमन ग्रँट इलियॉटची तारिफ केली आहे, आमीरने इलियॉटला शानदार खेळाडू म्हटलंय.

आमीरने आपल्या ट्ववीटवर म्हटलं. काय मॅच होती, इलियॉटची इनिंग शानदार होती, त्यांने दक्षिण आफ्रिकेच्या हातातून सामना हिसकावून आणला. मात्र यापुढे भविष्यवाणी आणि मिश्किलपणे बोलतांना आमीर म्हणतो, हे तर होणारच होतं, कारण न्यूझीलंडचा पराभव भारताच्या हातीच लिहलाय.

क्रिकेट वर्ल्ड कप २०१५ च्या फाइनल फायनलमध्ये न्यूझीलंडसोबत कोणती टीम खेळणार हे २६ मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. २६ मार्च रोजी ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया आमने-सामने येणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.